Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या मांडीवर बसून क्युट स्माईल देणाऱ्या या मुलीला ओळखलंत का ? आज आहे सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 07:00 IST

या अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सध्या सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. या ट्रेंडमध्ये सेलिब्रेटी मंडळीदेखील सामील झाले आहेत. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री, सेलिब्रेटींनी देखील त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात.  दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा सोशल मीडियावर व्हायरल होतोया. फोटोत बाबांच्या मांडीवर बसलेली ही क्युट अभिनेत्री आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून मुक्ता बर्वे आहे. मुक्ता या फोटोत वडिलांच्या मांडीवर बसून क्युट स्माईल देताना दिसतेय. मुक्ताने शेअर केलेला हा थ्रोबॅक फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. मुक्ता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ते आपले फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर सातत्याने शेअर करत असते. 

अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर मुक्ता बर्वेची ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका नुकतीच संपली. या मालिकेत मुक्ता अभिनेता उमेश कामतसोबत दिसली होती.  या मालिकेत तिने साकारलेल्या मीराच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. मुक्ता बर्वेने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपला ठसा उमटविला आहे. आम्हाला वेगळे व्हायचेय हे तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचे नाटक खूप गाजले होते. त्यानंतर ती घडलं- बिघडलंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. तिने थांग, देहभान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर जोगवा, डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई सारख्या हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :मुक्ता बर्वेसेलिब्रिटी