Join us
Daily Top 2Weekly Top 5

या चिमुकलीला ओळखलंत का?; आज मराठी कलाविश्वावर करतेय राज्य; आई देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 08:00 IST

फोटोत आजसोबत दिसणारी ही मुलगी आज मराठीसह बॉलिवूडवर राज्य करते आहे.

सध्या सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. या ट्रेंडमध्ये सेलिब्रेटी मंडळीदेखील सामील झाले आहेत. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री, सेलिब्रेटींनी देखील त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. दरम्यान मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा सोशल मीडियावर व्हायरल होतोया. फोटोत आईसोबत उभी असलेली ही चिमुकली आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐवंढच नाही तर तिची आईही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून हा चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष आहे. मृताने सोशल मीडियावर तिच्या लहानपणीचा आईसोबतचा फोटो शेअर केला होता.  अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे.फोटोत तिच्यासोबत ज्योती सुभाष देखील दिसत आहेत. 

 अमृताचे शिक्षण दिल्ली येथील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये झाले आहे. तिने हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांच्या नाटकात काम केले. तिचे ‘ती फुलराणी’ हे नाटक खूप गाजले. 2004 साली तिने ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका सुद्धा आहे. 2012 साली तिने मराठी ‘सा रे ग म प’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सेलिब्रिटी पर्वात भाग घेतला होता. अमृता सुभाष ही उत्तम लेखिका असून तिचे 2014 साली ‘एक उलट एक सुलट’ हे पुस्तक प्रकाशित झाले. नुकतीच अमृता लस्ट स्टोरी २ मध्ये दिसली होती. 

टॅग्स :अमृता सुभाष