Join us

लेखकांना दुय्यम वागणूक देऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 17:12 IST

               मराठी चित्रपट आज जगभरात पोहचला आहे. मराठी चित्रपटांची चर्चा सातासमुद्रापार होऊ ...

 
              मराठी चित्रपट आज जगभरात पोहचला आहे. मराठी चित्रपटांची चर्चा सातासमुद्रापार होऊ लागली आहे. परंतू  चित्रपट चालतो त्यामागे अनेक जणांचे कष्ट असते हे विसरून चालणार नाही. आपल्याला पडद्यावर दिसणारे हिरो-हिरोईन फक्त लक्षात राहतात. चित्रपटाला जन्माला घालणाºया लेखंकाचे नाव मात्र प्रेक्षकांना माहित नसते. लेखकांना आजही दुय्यम वागणूक दिली जाते अशी खंत अनेक लेखक व्यक्त करित आहेत. नूकतेच अभिनेता व लेखक हेमंत ढोमे याने टविटरवर , चित्रपट लेखकांमुळे चालला पण त्यांनाच दुय्यम वागणूक दिली जाते. हे दुर्देव बदलायला हवे असे टविट केले आहे. या बद्दल हेमंतने सीएनएक्सशी संवाद साधला. तो म्हणाला, लेखकांना निर्मात्यांकडून योग्य ते मानधन दिले जात नाही. आज कोटीच्या कोटी बजेट असलेल्या चित्रपटांचे निर्माते लेखकांना कमी मानधन तर देतातच परंतू वेळेवर देखील पैसे दिले जात नाहीत. तर काही वेळेस  मानधनच बुडविले जाते. लेखक त्याच्या चित्रपटाशी भावनिकदृष्ट्या जास्त जवळ असतो. कथेमुळे चित्रपट चालत असताना देखील लेखकांच्या कामाचे कौतुक केले जात नाही. अनेक असे लेखक आहेत ज्यांनी दर्जेदार कथा लिहिल्या आहेत, त्यांचे चित्रपट देखील सुपरहिट झाले. परंतू या लेखकांना प्रेक्षक ओळखत नाहीत. लेखक कायमच प्रसिद्धीच्या झोतापासून दुर राहिले आहेत. आपल्याकडील ही परिस्थिती खरच बदलायला हवी. अशी खंत हेमंतने  व्यक्त केली.