Join us
Daily Top 2Weekly Top 5

दो दिल मिल रहें है चुपके चुपके,दिल दोस्ती दुनियादारीचे हे मित्र सखी-सुव्रत रिअल रिलेशिनशिपमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 14:53 IST

आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलं कलेच्या क्षेत्रात नाव कमावणे ही नवी गोष्ट राहिली नाही. आपल्या आईवडिलांच्या अभिनयाचा ...

आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलं कलेच्या क्षेत्रात नाव कमावणे ही नवी गोष्ट राहिली नाही. आपल्या आईवडिलांच्या अभिनयाचा वारसा त्यांची मुलं आणि मुली समर्थपणे चालवत असल्याची अनेक उदाहरणं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आहेत.यांत आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री सखी गोखले हिचा. दिवंगत अभिनेता मोहन गोखले आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांची लेक म्हणजे सखी गोखले. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर दमदार एंट्री मारली. आपल्या पहिल्याच मालिकेत सखीने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. मालिकेतील तिचा अभिनय सा-यांनाच भावला. अभिनयासह लूक्सने तिने रसिकांवर जादू केली. यामालिकेत तिने तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी भूमिका साकारली होती.या मालिकेत अभिनेता अमेय वाघ, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे, स्वानंद टिकेकर, पुष्करराज अशा विविध कलाकारांच्या भूमिका होत्या. मालिकेत या कलाकारांनी धम्माल मस्ती केली. रसिकांनाही त्यांची ही धम्माल मस्ती चांगलीच भावली होती. या सगळ्या कलाकारांमध्ये चांगलेच बॉन्डिंग जमलं होतं.मात्र यापैकी एकाशी सखीची चांगलीच गट्टी जमली. सखीचे सोशल मीडियावरील फोटो पाहून दो दिल मिल रहें है चुपके चुपके अशी शंका तुम्हालाही आल्याशिवाय राहणार नाही.सखीसह या फोटोत दिल दोस्ती दुनियादारीमधील अभिनेता सुव्रत जोशी पाहायला मिळत आहे. अनेक फोटोंमध्ये सखी आणि सुव्रतचे अनोखं बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या सुव्रत हा एका डान्स रियालिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे. मात्र बिझी शेड्युलमधून सखी आणि सुव्रत दोघं एकमेंकांसह वेळ घालवत असल्याचे त्यांच्या सोशल मीडियावरील फोटो पाहून दिसून येते. नुकतेच सुव्रतने सखीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.या फोटोला त्याने दिलेली कॅप्शन लक्षवेधी होती.सखीचे कौतुक करण्यासाठी आय लव्ह हर असं रोखठोकपणे लिहीत जणू काही आपल्या प्रेमाची जाहीर कबुलीच दिली अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. सुव्रतने आपल्याप्रेमाची अशी अप्रत्यक्ष कबुली दिली असली तरी सखीने याबाबत अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.सुव्रतचे सखीची आई शुभांगी गोखले यांच्याशीही चांगलेच बॉन्डिंग आहे. त्यामुळे सखी आणि सुव्रतच्या प्रेमामध्ये सध्या तरी काहीही अडचण नसून आपल्या प्रेमाची दोघंही जाहीर कबुली कधी देतात याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना नक्कीच असेल.