Join us
Daily Top 2Weekly Top 5

घराघरांत पोहोचतंय 'डी.एन.ए.'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 06:35 IST

आजवर नाटक हे रंगभूमीवर होतानाच आपण पाहिले आहे; पण नाटक रंगभूमी सोडून घरात सादर केलं जातयं, असं सांगितलं तरं? ...

आजवर नाटक हे रंगभूमीवर होतानाच आपण पाहिले आहे; पण नाटक रंगभूमी सोडून घरात सादर केलं जातयं, असं सांगितलं तरं? आता म्हणाल, नाटक काय प्रत्येकच घरात होत असतं.. त्यात काय नवीन? जोक्स अपार्ट.. रंगभूमीवर घराचा सेट, खर्‍या वाटणार्‍या भिंती असं आपण अनेकदा पाहतोच; पण रंगभूमीवर चालणारं नाटकच घराघरांमध्ये सादर केल जात आहे. वाटलं ना आश्‍चर्य? पण, हे खरचं आहे अहो. हा एक नवीन प्रयोग सध्या एक नाटक संस्था करत आहे. आहे की नाही भारी? सायप्रस, युरोप येथील जिओर्गस निओफायटू यांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग ५ डिसेंबरला शीतल ओरपे यांच्या घरी होणार आहे. तब्बल तीस वर्षे उलटून गेली तरी युद्धावर गेलेला आपला नवरा नक्की परत येईल, अशी आशा आणि खात्री असलेली त्याची बायको, तरुण दिसण्यासाठी ती करीत असलेला खटाटोप, बेपत्ता वडिलांना बालमैत्रिणींसमवेत शोधून काढायची मुलीची धडपड; मात्र तरीही त्यांच्या कधीही न मावळणार्‍या आशा या कथेभोवती 'डी.एन.ए.' हे संपूर्ण नाटक फिरते. घरातलाच विषय घरात मांडला जात असल्याने तो प्रेक्षकांवर अधिक प्रभाव पाडतो. या अनोख्या प्रयोगाबद्दल विद्यानिधी वनारसे सांगतात, की नाटकाच्या सरावाच्या वेळी घरी नाटकाचे प्रयोग करू या असे अजिबातच डोक्यात नव्हते; पण एकदा हा प्रयोग करून बघितला आणि सर्वांनाच तो आवडला आणि आजवर जिथे-जिथे या नाटकाचे प्रयोग झाले आहेत, तिथे सगळ्यांकडून या प्रयोगाला पसंती मिळत आहे.