Join us
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवारी म्युझिकल व्हिडीयो प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 12:54 IST

आषाढी एकादशीच्या निमित्ताने रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत आणि मेघना जाधव निर्मित आनंदवारी हा म्युझिकल व्हिडीयो सोशल मिडीयावर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. आनंदवारी या म्युझिकल व्हिडीयोमध्ये वारीचे अप्रतिम क्षण प्रथमेश रांगोळे आणि स्वप्नील पवार यांनी टिपले आहेत.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत आणि मेघना जाधव निर्मित आनंदवारी हा म्युझिकल व्हिडीयो सोशल मिडीयावर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.  आनंदवारी या म्युझिकल व्हिडीयोमध्ये वारीचे अप्रतिम क्षण प्रथमेश रांगोळे आणि स्वप्नील पवार यांनी टिपले आहेत. ज्ञानोबा, माऊली तुकाराम...या सुंदर गाण्याचे बोल पारंपारिक असून आदित्य ओक यांनी हे गाणं संगीतबध्द केले आहे. अजित विसपुते, सौरभ दफ्तरदार, हेमंत वाळुंजकर, संदीप उबाळे, भाग्यश्री अभ्यंकर, अमिता घुगरी, मुक्ता जोशी आदींनी मिळून हे गाणं गायले आहे.