Join us

‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा व्हिडीयो प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 12:45 IST

आगामी मराठी चित्रपट ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या चित्रपटाच्या सुंदर टिझर, ट्रेलरने आधीच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता सोशल मिडीयावर ...

आगामी मराठी चित्रपट ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या चित्रपटाच्या सुंदर टिझर, ट्रेलरने आधीच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता सोशल मिडीयावर या चित्रपटाचा ‘ये ना जरा’  या पहिल्या गाण्याचा व्हिडीयो प्रदर्शित झाला.

‘ये ना जरा’ हे गाणं स्पृहा जोशी आणि सिध्दार्थ चांदेकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं सोनिया मुंढे आणि शुभांकर शेंबेकर यांनी गायलं आहे आणि शुभांकर शेंबेकरनेच या गाण्याला संगीत दिलं आहे. डॉ. राहुल देशपांडे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

गोल्डन गेट मोशन पिक्चर्स आणि विनोद मलगेवार निर्मित  ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या चित्रपटात स्पृहा जोशी आणि सिध्दार्थ चांदेकर यांच्यासह डॉ. मोहन आगाशे आणि मंगेश देसाई यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. ऋतुराज धालगडे लिखित आणि दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ २९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.