Join us

‘हाफ तिकीट’चे आकर्षक पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 18:19 IST

छोट्यांना क्रेंद्रस्थानी ठेवून त्यांचे भावविश्व रेखाटणारा ‘हाफ तिकीट’ या चित्रपटाचे पहिले डिजीटल पोस्टर आपण सर्वांनीच पाहिले. आता या चित्रपटाचे ...

छोट्यांना क्रेंद्रस्थानी ठेवून त्यांचे भावविश्व रेखाटणारा ‘हाफ तिकीट’ या चित्रपटाचे पहिले डिजीटल पोस्टर आपण सर्वांनीच पाहिले. आता या चित्रपटाचे दुसरे आकर्षक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर पाहिल्यावर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी उत्सुकता नक्कीच वाढली असेल.फॉक्स स्टार स्टुडियोझ प्रस्तुत आणि व्हिडीयो पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी निर्मित ‘हाफ तिकीट’ चित्रपटाचे दिग्दर्शन समीत कक्कड यांनी केले आहे. समीत कक्कड लहान मुलांची अनोखी कहानी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणार आहेत. हा चित्रपट १५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.