Join us

करोडपती माणसातील अहंकाराची अलगद छुट्टी करणारा ‘डिस्को सन्या’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 13:25 IST

   कलाकारांची लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट : चित्रपटाचा प्रवासही रोमांचकारी                  ...

   कलाकारांची लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट : चित्रपटाचा प्रवासही रोमांचकारी                      गरीबीतुन वर येऊन करोडपती बनणाºया माणसांपैकी बºयाचजणांना त्यांच्याकडील पैशाचा, समृद्धीचा अहंकार येतो. जन्मजात धनवान माणसांमध्येही तो असतोच. अशा धनवान पण अहंकारी माणसांचा अहंकार झोपडपट्टीतल्या, अनाथ मुलाकडून मोठे लेक्चर न देता, अलगदपणे आणि   सहजतेने क्षणात दुर होऊन त्या व्यक्तीमधला आतला आणि बाहेरचा संघर्ष डोळस आणि वेगळ्या नजरेने पाहुन अंर्तमुख करावा लावणारा ‘डिस्को सन्या’ प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक नियाज मुजावर व अभिनेता संजय खापरे यांनी व्यक्त केला. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त या चित्रपटाच्या टीमने नुकतीच ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या गाभ्याची आणि निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली. चित्रपटात ‘श्रेयस काळे’ची म्हणजेच करोडपती झालेल्या व्यक्तीची भूमिका करणाºया संजय खापरे यांनी सांगितले की, स्वत:च्या हिंमतीवर वैभव प्राप्त केलेल्या आणि त्यातुन थोडा अहंभाव आलेल्या व्यक्तीची भूमिका मी साकारतो आहे. टोकाचा श्रीमंत आणि टोकाचा गरीब अशा दोन व्यक्तींची, त्यांच्या दृष्टीकोनाची, त्यांच्या विचारसरणीची आणि त्यांच्या वागण्याबोलण्याची कहाणी म्हणजे हा चित्रपट आहे. मी आजवर केलेल्या चित्रपटांपैकी हा सर्वात सुंदर आणि वरच्या पायरीवरचा चित्रपट असेल असा विश्वास वाटतो असेही संजय खापरे यांनी यावेळी सांगितले. चित्रपटात डिस्को सन्याची भूमिका करणाºया पार्थ भालेरावने सांगितले की, डिस्को डान्सर मिथुन चक्रवतीची गाणी ऐकुनच झोपणारा, झोपडपट्टीत रहाणारा, अनाथ असणारा ‘सन्या’ मी यात रंगवला आहे. या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर मला ती खुप आवडली. प्रत्यक्षात शुटिंग सुरु झाल्यानंतर तर चित्रपट कमी वाक्यांमधुन आणि दृष्यांमधुन खुप मोठा संदेश देणारा, प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा सिनेमा आहे याची मला खात्री पटली. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. माझ्यातील चांगले काढून घेण्याचा प्रयत्न केला. सचिन पुरोहित व अभिजीत कवठळकर यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. या चित्रपटात तीनच गाणी असून ती अवधूत गुप्ते, नंदेश उमप, ऋषभ पुरेहित, शबाब साबरी यासारख्या लोकप्रिय गायकांनी ती गायली आहेत.  ५ आॅगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाºया या चित्रपटाबाबत आपण आशावादी असल्याचे सांगत समाजात कोणत्याही आर्थिक स्तरात वावरताना विनम्रता किती आवश्यक आहे हा संदेश अप्रत्यक्षपणे देणारा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असेही सचिन पुरोहित यांनी सांगितले. या चित्रपटात  पार्थ भालेराव, संजय खापरे यांच्यासह चित्रा खरे, गौरी कोंगे, सुहास शिरसाठ, उमेश जगताप हे प्रमुख भूमिकेत आहे.  संपुर्ण कुटुंबासह बघता येणारा आणि सहज सोप्या पद्धतीने अंतर्मुख करणारा हा चित्रपट असल्याचे यावेळी कलाकरांनी सांगितले.