शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचा दिग्दर्शक करणार चित्रपटांचे दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 10:45 IST
शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचा दिग्दर्शक राजकुमार तांगडे लवकरच चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. साखर या आपल्या रोजच्या ...
शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचा दिग्दर्शक करणार चित्रपटांचे दिग्दर्शन
शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचा दिग्दर्शक राजकुमार तांगडे लवकरच चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. साखर या आपल्या रोजच्या जीवनातील गोष्टीवर तो चित्रपट बनवणार आहे. साखर जीवनासाठी खरेच आवश्यक आहे की नाही असा या चित्रपटाचा विषय आहे. या चित्रपटाचे नाव चिवटी असे असून यात अभिनेता मिलिंद शिंदे, संभाजी तांगडे, अश्विनी भालेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत