Join us

दिपाली सय्यदचा मुलासोबतचा डान्स व्हायरल, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले- ही तर संतूर मम्मी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 09:09 IST

मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदने बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदने बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे. दिपाली सय्यदचा सिनेइंडस्ट्रीतील प्रवास मालिकेतून सुरू झाला.  बंदिनी, समांतर या तिच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या मालिका आहेत. दिपाली जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखल्या जाते. मात्र खऱ्या अर्थाने ओळख जत्रा सिनेमातील ये गो ये मैना या गाण्यातून तिला मिळाली. दीपाली सय्यदच्या डान्सचे देखील लाखो चाहते आहेत... आतापर्यंत अनेक डान्स रिआलिटी शोज मध्ये दीपाली परिक्षक म्हणून दिसलीये.. अभिनयाबरोबरच दीपालीला एक उत्तम डान्सर देखील आहे.. 

दिपालीनं अलीकडेच आपल्या मुलासोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाये.. ज्यात ती मुलासोबत रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करताना दिसतेयं.. दीपालीच्या मुलाचे नाव अली सय्यद असून त्याला ट्रॅव्हलिंगची भारी आवड आहे. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर नजर मारली तर त्याच्या भटकंतीचे कित्येक फोटोज तुम्हाला पाहायला मिळतील. ट्रॅव्हलिंगसोबत तो आपल्या फिटनेसला घेऊन प्रचंड डेडिकेटेड आहे... शॉर्ट फिल्ममध्ये देखील अलीनं काम केलंय..आई आणि मुलाच्या या हा डान्स व्हिडिओवर फॅन्सनी लाईक्सचा वर्षाव केलाये.. तर दीपाली ही संतूर मॉम आहे असं अनेकांनी कमेंट करत म्हटलंय..

दिपालीने करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला व मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटात त्यांनी काम केले.

टॅग्स :दीपाली सय्यद