Join us
Daily Top 2Weekly Top 5

सचिन-सुप्रिया आशा भोसलेंसह डिनरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 22:18 IST

        सर्वांची लाडकी जोडी सचिन- आणि सुप्रिया त्यांच्या बहारहार अभिनयाने सर्वांच्याच मनात घर करुन आहेत. टिव्ही ...

        सर्वांची लाडकी जोडी सचिन- आणि सुप्रिया त्यांच्या बहारहार अभिनयाने सर्वांच्याच मनात घर करुन आहेत. टिव्ही वरील रिअ‍ॅरिली शोज मध्ये देखील सहभागी होऊन या कपलने बाजी मारली होती. मराठी इंडस्ट्री असो किंवा बॉलीवुड या दोघांची ही एव्हरग्रीन जोडी सगळ््यांनाच भावते. नूकतेच त्यांनी गायिका आशा भोसले यांच्यासोबत डिनर केला.       आशाताईंना या दोघांबद्दल इतके प्रेम आहे कि त्यांनी डिनरच्या वेळीचा सचिन-सुप्रिया सोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोत आशाताईंनी निळ््या रंगाची साडी, मोत्याची माळ घातलीय. तर सुप्रिया पिवळ््या कलरच्या पंजाबी सुट मध्ये दिसत आहे. सचिन आणि सुप्रिया या दोघांनेही आशाताईंच्या हातात हात दिले असुन त्यांच्या नात्यातील ऋणानूबंधच या फोटोतून पहायला मिळतो. एन्जॉएबल डिनर विथ सचिन अ‍ॅन्ड हिज वंडरफुल वाईफ सुप्रिया अशा शब्दांत आशाताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.