Join us

वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:16 IST

दिलीप प्रभावळकर यांचा आज ८१वा वाढदिवस आहे. वयाची ऐंशी गाठली तरीही दिलीप प्रभावळकर एकदम फिट आहेत. एका मुलाखतीत दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या फिटनेसचा एक मजेशीर किस्सा सांगितला होता.

दिलीप प्रभावळकर हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते. अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम करून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. 'चौकट राजा', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'पछाडलेला', 'नारबाची वाडी' या मालिक आणि सिनेमांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. मराठीसोबतच दिलीप प्रभावळकर यांनी हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. आज त्यांचा ८१वा वाढदिवस आहे. वयाची ऐंशी गाठली तरीही दिलीप प्रभावळकर एकदम फिट आहेत.

एका मुलाखतीत दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या फिटनेसचा एक मजेशीर किस्सा सांगितला होता. "आमच्याच घराच्या परिसरात रात्री उशीरा येताना ५ कुत्रे माझ्या मागे लागले होते. ते मोजून ५ होते. त्या कुत्र्यांची मालकीण जवळपास होती. तिथून ती ओरडत होती. अर्जुन असं नाही करायचं...अर्जुन असं नाही करायचं. त्या ५ कुत्र्यांपैकी कोणाचं नाव अर्जुन होतं ते मला कळलं नाही. पण ती मला धीर देत होती की त्याला इंजेक्शन दिलेलं आहे. पण, मी त्याला अर्जुन म्हणण्याच्या मनस्थितीत नव्हतो. तो मला चावण्याच्या आधी मी जेवढं जोरात पळता येईल तेवढा पळालो. तेव्हा मला माझ्या फिटनेसचं कौतुक वाटलं", असं दिलीप प्रभावळकर म्हणाले होते. रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता. 

"ती बाई नंतर मला भेटली नाही. ती बाई खरंच होती की तिचा मला भास झाला हे माहीत नाही. तिने मला धीर दिला की कुत्र्याला इंजेक्शन दिलंय काळजी करू नका. म्हणजे तुम्हाला घ्यायला लागणार नाही. ती कुत्रे दिवसा चांगली असतात. पण, रात्री त्यांना काय झालेलं माहीत नाही. ते स्ट्रे डॉग होते. त्यांच्यामुळे काही लोकांनी चालायला जाणं सोडलं आहे. पण यामुळे मला आत्मविश्वास आला की आपण या वयातही छान पळू शकतो", असंही दिलीप प्रभावळकर म्हणाले. 

टॅग्स :दिलीप प्रभावळकर सेलिब्रिटी