Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिल क्यूँ ना बने पागल..; निसर्गाच्या सानिध्यात धबधब्याजवळ प्रार्थनाने शूट केला सुंदर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 17:37 IST

Prarthana behere: प्रार्थनाने नुकतीच एका निसर्गरम्य ठिकाणाला भेट दिली. येथील एक व्हिडीओदेखील तिने शेअर केला आहे.

मराठी कलाविश्वातील सुंदर, देखणी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे (prarthana behere). अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली प्रार्थना सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते. यात अलिकडेच तिने एक सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सध्या अनेक कलाकार मान्सून सीजन एन्जॉय करत आहेत. त्यामुळे काही जण ट्रेकिंग, धबधबे अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पावसाचा आनंद घेत आहेत. यात प्रार्थनाही मागे नाही. प्रार्थनाने नुकतीच एका निसर्गरम्य ठिकाणाला भेट दिली. येथील एक व्हिडीओदेखील तिने शेअर केला आहे.

प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका धबधब्याजवळ उभी आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रार्थनाने छान ड्रेस परिधान केला आहे. सोबतच तिने एका जुन्या गाण्यावर रिलदेखील केलं आहे. दिवाना हुआ बादल या गाण्यावर तिने रिल केलं आहे.  तिचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्यावर प्रचंड कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटी