दिल दोस्ती दुनियादारीची टीम कास्टिंग काउचमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 12:36 IST
तरूणांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी दिल दोस्ती दुनियादारीची टीम यंदा कास्टिंग काउचमध्ये झळकणार आहे. या शोच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिल दोस्ती दुनियादारीची मस्ती तरूणांना पाहायला मिळणार आहे. याच मालिकेचा तरूणींची धडकन बनलेला अमेय वाघ व निपुण धर्माधिकारी या दोघांनी मिळून सुरू केलेल्या कास्टिंग काऊचच्या वेब एपिसोडला भरघोस प्रतिसाद मिळतान दिसत आहे.
दिल दोस्ती दुनियादारीची टीम कास्टिंग काउचमध्ये
तरूणांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी दिल दोस्ती दुनियादारीची टीम यंदा कास्टिंग काउचमध्ये झळकणार आहे. या शोच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिल दोस्ती दुनियादारीची मस्ती तरूणांना पाहायला मिळणार आहे. याच मालिकेचा तरूणींची धडकन बनलेला अमेय वाघ व निपुण धर्माधिकारी या दोघांनी मिळून सुरू केलेल्या कास्टिंग काऊचच्या वेब एपिसोडला भरघोस प्रतिसाद मिळतान दिसत आहे. याच वेब एपिसोडची सुरूवात राधिका आपटेपासून सुरू झाली होती. तर दुसºया एपिसोडमध्ये श्रिया पिळगांवकर झळकली होती. आता, तिसºया एपिसोडमध्ये दिल दोस्ती दुनियादारीतील रेश्मा, अॅना आणि मिनल म्हणजेच सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर यांनी हजेरी लावली. यंदाच्या एपिसोडमध्ये अमेयच्या प्रश्नावर स्वानंदी आणि सखीची सडेतोड उत्तरं देताना पाहायला मिळाल्या.