Join us

दिल दोस्ती दुनियादारीची टीम रंगभूमीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 15:03 IST

 Exculsive - बेनझीर जमादारतरूणांईच्या मनावर राज्य करणारी मालिका दिल दोस्ती दुनियादारीची टीम प्रेक्षकांना लवकरच रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. यामुळे ...

 Exculsive - बेनझीर जमादारतरूणांईच्या मनावर राज्य करणारी मालिका दिल दोस्ती दुनियादारीची टीम प्रेक्षकांना लवकरच रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. यामुळे दिल दोस्तीच्या.. चाहत्यांना एक सुखद धक्का नक्कीच बसला असेल. या मालिकेवर प्रेक्षकांनी खूपच कमी कालावधीत भरभरून प्रेम दिले होते. त्याचबरोबर या मालिकेच्या दुसºया सिझनचीदेखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र या मालिकेच दुसरे सीझन येणार की नाही? हे अजून तळयात मळयातच आहे. मात्र दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील कलाकारांना आता नाटकाच्या माध्यमातून चाहत्यांना प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळणार असल्याने हा आनंद चाहत्यांसाठी नक्कीच व्दिगुणीत असणार आहे. हे नाटक निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित करणार असल्याचे सुत्रांकडून कळते. तसेच या नाटकाची तालीमदेखील जोरात चालू असल्याचे देखील कळते. त्याचबरोबर या नाटकामध्ये अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे असणार आहेत. मात्र स्वानंदी टिकेकर व पुष्कराज चिरपुटकर आहेत की नाही याबाबत अजून शंका आहे. मात्र या नाटकाविषयी दिल दोस्ती दुनियादारीमधील सुजय म्हणजेच सुव्रत जोशी याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला, हो, दिल दोस्ती दुनियादारीची टीम लवकरच तुम्हाला रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. मात्र या नाटकाचे नाव अजून गुलदस्त्यात आहे.  यासाठी प्रेक्षकांना फक्त काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.