दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकमधील सहावं पुष्प ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातूनछत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा थरार प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. नुकतंच ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’या ऐतिहासिक सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या टीझरपासूनच प्रेक्षक सिनेमाची वाट पाहत होते. आता ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि नेतृत्वामुळे नव्हे तर त्यांची तल्लख बुद्धिमत्ता, अद्वितीय रणनीती आणि विचारसरणी यामुळे सदैव आपल्या स्मरणात आहेत. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक जोखमीची घटना होती. पण या भेटीतून त्यांच्या कणखर नेतृत्वाची खरी झलक दिसली. हा सगळा शौर्याचा इतिहास पुन्हा चाहत्यांना‘रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमातून पाहायला मिळणार आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला औरंगजेबाचा क्रूर चेहरा दिसत आहे. मराठा हमारे आगे सीना तान के खडे होते है, अब उनको झुकाने का वक्त आ गया है असं म्हणत औरंगजेबाचा शिवाजी महाराजांना भेटण्याचा छुपा मनसुबा समोर येत आहे. तेवढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची धमाकेदार एन्ट्री होताना दिसते. औरंगजेबाकडून दिल्ली भेटीचा प्रस्ताव आल्यानंतर महाराज त्याला आग्र्यात भेटण्याची युक्ती लढवत रणनीती आखत असल्याचंही दिसत आहे. आग्रा भेटीचा हा थरार अंगावर काटा आणणारा आहे. या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या अभिजीत विश्वचंद्रचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे.
दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ३० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक या कलाकारांच्या भूमिका आहेत.
Web Summary : The trailer for 'Ranapati Shivray Swari Agra' is out, showcasing Shivaji Maharaj's Agra visit. The film highlights his intelligence and strategy against Aurangzeb. Directed by Digpal Lanjekar, the movie releases on January 30th, featuring Abhijit Shwetachandra as Shivaji.
Web Summary : 'रणपति शिवराय स्वारी आगरा' का ट्रेलर जारी, शिवाजी महाराज की आगरा यात्रा दिखा रहा है। फिल्म औरंगजेब के खिलाफ उनकी बुद्धिमत्ता और रणनीति पर प्रकाश डालती है। दिगपाल लांजेकर द्वारा निर्देशित, फिल्म 30 जनवरी को रिलीज होगी, जिसमें अभिजीत श्वेताचंद्र शिवाजी के रूप में हैं।