ए गरम बांगड्या, गरम बांगडया… हे शब्द कानावर पडताच एलिझाबेथ एकादशीमधील झेंडू आठवली ना... झेंडूची भूमिका बालकलाकार सायली भंडारकवठेकर हिने साकारली होती. २०१४ साली परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अभिनेत्री नंदिता धुरी, श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, पुष्कर लोणारकर, दुर्गेश बडवे हे बालकलाकार मुख्य भूमिकेत होते.
श्रीरंग महाजनने ज्ञानेश तर सायलीने मुक्ता अर्थात झेंडूची भूमिका साकारली होती. आपली सायकल वाचवण्यासाठी या बालकलाकारांनी जो काही आटापिटा केला त्यातून घडणाऱ्या घडामोडीचे दर्शन दिग्दर्शकाने अतिशय उत्तमपणे रेखाटले आहे.
अगदी लहान असल्यापासूनच सायलीने भरतनाट्यमचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती आणि यातच तिला आपले करियर करायचे आहे.