Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तेजश्री प्रधानची नवी पिग्गी बँक तुम्ही पाहिली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 12:18 IST

तेजश्री प्रधान होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या व्यक्तिरेखेमुळे प्रचंड प्रसिद्ध झाली. ही मालिका संपली असली ...

तेजश्री प्रधान होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या व्यक्तिरेखेमुळे प्रचंड प्रसिद्ध झाली. ही मालिका संपली असली तरी तिची या मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ती नुकतीच ती सध्या काय करते या चित्रपटात देखील झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक करण्यात आले होते. तेजश्री आज छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तेजश्री नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहात असते. नुकतीच तिने फेसबुक या सोशल नेटवर्किंगला एक खूप छान पोस्ट लिहिली होती. तिने तिच्या पिग्गी बँकविषयी या पोस्टमधून माहिती दिली आहे. पण तिच्या या पिग्गी बँकचा वापर ती पैसे जमवण्यासाठी करत नाही तर आयुष्यातील चांगले क्षण, आठवणी साठवण्यासाठी करत आहे.तिच्या या पिग्गी बँकविषयी तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, काही दिवसांपूर्वी माझ्या एका भावाने सहजच मला एक भेटवस्तू दिली. खरे तर त्याने मला भेटवस्तू देण्यासाठी ना माझा वाढदिवस होता ना कोणता सण. पण तरीही त्याने मला एक पिग्गी बँक दिली. ही पिग्गी बँक पाहून त्या क्षणाला खरे तर मला हसूच आले होते. हा काय बालिशपणा असे मला तेव्हा वाटले होते. पण तो मला पटकन म्हणाला, यात छान क्षण, आठवणी साठव. मस्त काहीतरी घडले की त्या अनुभवांना शब्दरूपाने यात जिवंत ठेव.. मला त्याचे हे बोलणे चांगलेच भावले. त्यामुळे तुम्हालाही पिग्गी बँक भेट करायला सांगावी असे वाटले आणि त्यासाठी ही पोस्ट लिहिली. तर सुरुवात आता स्वत:पासूनच करा. दिवसभरात एक चांगली गोष्ट नक्कीच घडते... ती लिहा. नंतर कधीतरी निवांत क्षणी ती वाचताना तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल.