सिद्धार्थ मेननचा नवा लूक पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2017 17:45 IST
अभिनेत्री नेहमीच त्यांच्या लूकच्या बाबतीत अलर्ट असतात. एखाद्या पार्टीला अथवा सार्वजनिक कार्यक्रमाला जाताना काय घालायचे याचा त्या 100 वेळा ...
सिद्धार्थ मेननचा नवा लूक पाहिला का?
अभिनेत्री नेहमीच त्यांच्या लूकच्या बाबतीत अलर्ट असतात. एखाद्या पार्टीला अथवा सार्वजनिक कार्यक्रमाला जाताना काय घालायचे याचा त्या 100 वेळा विचार करतात. पण त्यांच्या तुलनेत अभिनेते फॅशनच्या बाबतीत तितके सतर्क असलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. पण सिद्धार्थ मेनन हा त्याच्या फेशन सेन्सबाबत प्रचंड अलर्ट असतो. आपली फॅशन ही सगळ्यांपेक्षा वेगळी असावी यासाठी तो प्रयत्न करत असतो. काही दिवसांपूर्वी तो एका आगळ्या वेगळ्या फॅशनमध्ये पाहायला मिळाला होता. सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी शर्टच्या खाली एक पटियाला पँट घातली होती. या पटियाला पँटची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानेदेखील या पटियाला पँट आणि शर्ट घातलेला त्याचा व्हिडिओ फेसबुकला शेअर केला होता. आणि त्यावर पटियाला पँट लगाके... नाचुंगा नाचुंगा असे लिहिले होते.सिद्धार्थचा हा लूक कोणत्या फॅशन डिझायनरने नव्हे तर त्याच्या पत्नीने डिझाइन केला होता. त्यामुळे त्याने ही पोस्ट लिहिताना या लूकसाठी त्याची पत्नी पौर्णिमा नायरचे आभार मानले आहेत. सिद्धार्थचा हा लूक त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. त्याच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा आहे. फेसबुकला त्याच्या या फोटोवर अनेक कमेंट अाले असून अनेकांनी या पोस्टला लाइक केले आहे.सिद्धार्थ मेननने खूप कमी काळात मराठी चित्रपटसृष्टीत चांगले नाव कमावले आहे. पोस्टर गर्ल, अँड जरा हटके, हॅपी जर्नी, पोपट यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. त्याने चित्रपटांसोबत काही वेब सिरिजमध्ये देखील काम केले आहे.