Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री कविता मेढेकरच्या लेकीला पाहिलंत का?, दिसते खुप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 07:00 IST

अभिनेत्री कविता मेढेकरची लेक लाइमलाइटपासून दूर राहते.

अभिनेत्री कविता मेढेकर या मालिका, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. कविता मेढेकर या पूर्वाश्रमीच्या कविता लाड. लहानपणी कुठल्याही नाटकात, एकांकिकेत न झळकलेल्या कविता लाड यांनी पेपरमधील जाहिरात वाचून पैलतीर या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. बालकलाकार म्हणून या मालिकेत झळकण्याची त्यांना नामी संधी मिळाली होती. पुढे ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असताना डॉ गिरीश ओक एक एकांकिका बसवत होते.

कलाकारांची निवडही त्यांनीच केली होती. पण त्यातील एक मुलगी आणि एका मुलाचा वाद झाला. या वादामुळे त्या मुलीला गिरीश ओक यांनी तडकाफडकी काढून टाकले आणि दारात उभ्या असलेल्या कविता लाड यांना ‘तू या एकांकिकेत काम करणार’ असे सांगितले. कविता लाड यांना अभिनयाचा कुठलाही अनुभव नसताना डॉ. गिरीश ओक यांनी अगोदर एकांकिका वाचायला सांगितली. कविता लाड यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. डॉ ओक यांनी कविताचे नाव सुचवल्यामुळेच 'घायाळ' या पहिल्या वहिल्या चित्रपटात झळकण्याची संधी त्यांना मिळाली होती. 

सुंदर मी होणार या नाटकाचे काहीच प्रयोग करण्यात येणार होते. मात्र नाट्यनिर्माते सुधीर भट यांनी हे नाटक पाहिले आणि कविताचे काम पाहून हे नाटक पुढे व्यावसायिक नाटक बनवायचे त्यांनी ठरवले. चार दिवस सासूचे, उंच माझा झोका, राधा ही बावरी, राधा प्रेम रंगी रंगली, एका लग्नाची गोष्ट, लपून छपून, उर्फी, एका लग्नाची पुढची गोष्ट या आणि अशा कित्येक मालिका, चित्रपट आणि नाटकांतून त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. मेजवानी परिपुर्ण किचन, जोडी जमली रे या शोचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते.

२००३ साली अभिनेत्री कविता लाड या आशिष मेढेकर यांच्यासोबत लग्न केले. ईशान आणि सनाया ही त्यांची दोन मुले आहेत. कविता लाड मेढेकर यांचे पती आशिष मेढेकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत. मुंबईतील ट्रायटॉन कम्युनिकेशन्समध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत.

नुकतेच त्यांनी गौरी गणपतीचे औचित्य साधून आपली लेक सनाया सोबतचा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केला. “माझी गौरी” असे कॅप्शन देऊन त्यांनी हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोवरून कविता मेढेकर आणि त्यांची लेक सनाया यांचे सेलिब्रिटींकडून कौतुक होताना दिसत आहे.

टॅग्स :कविता लाड