Join us

'दृश्यम' चित्रपटातील या चिमुरडीला ओळखलंत का?; आता दिसते खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 07:00 IST

२०१५ साली 'दृश्यम' चित्रपटातील या चिमुरडीला आता ओळखणं झालंय कठीण

२०१५ साली दृश्यम चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील चिमुरडी अनु साळगावकरची भूमिका साकारणारी बालकलाकार मृणाल जाधव हिने आपल्या अभिनयाने सर्वांना चकीत करून सोडले. तिने या चित्रपटात केलेला निरागस अभिनय आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. बालकलाकार मृणाल जाधव आता चांगलीच मोठी झाली असून खूप सुंदर दिसते. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

दृश्यम चित्रपटातील मृणाल जाधवच्या कामाचे कौतुक फक्त प्रेक्षकांनीच नाही तर अभिनेता अजय देवगणने देखील केले होते. २०१३ साली राधा ही बावरी या मालिकेमधून मृणालने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

त्यानंतर २०१४ साली रितेश देशमुखच्या लय भारी या चित्रपटात देखील तिने काम केले होते. तेव्हा तिची चिमुकल्या रखुमाईची भूमिका सर्वांच्याच मनाला खूप भावली होती. तु ही रे या स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांच्या सिनेमांमध्ये देखील, त्यांच्या मुलीचे काम मृणालने केले होते. त्याचबरोबर नागरिक, कोर्ट, टाइमपास, अंड्याचा फंडा या चित्रपटांमध्ये देखील ती झळकली आहे.

मृणाल जाधव आता मोठी झाली असून आता तिला ओळखणं कठीण झाले आहे. तिचे आताचे काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.  शेवटची ती भयभीत या चित्रपटात पाहायला मिळाली.  

टॅग्स :अजय देवगण