Join us

ये दोस्ती हम नहीं तोडेंगे ! मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे सई ताम्हणकरची बेस्ट फ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 19:24 IST

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.

मैत्रीचं स्थान सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असते मग ते सर्वसामान्य असो किंवा सेलिब्रेटी.मराठी सिनेसृष्टीतील कलाकार ही आपल्या मैत्रीसाठी काहीही करायला तयार असतात. येथे निखळ मैत्री जपणारे अनेक कलाकार आहेत. खरं तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दोन अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र मराठी चित्रपटसृष्टील याला अपवाद आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत. यापैकीच एका जोडीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. पण तुम्हाला माहिती आहे का कोण आहे सई ताम्हणकरची बेस्ट फ्रेंड कोण आहे.  सई अनेकवेळा तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून गिरिजा ओक आहे. सईने काही दिवसांपूर्वीच गिरिजासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत दोघी बसून गप्पा मारताना दिसत होत्या. फोटो बघून दोघींमधलं बॉन्डिंग अधोरेखित होते. गिरिजासुद्धा सईसोबतचे फोटो शेअर करत असते. 

सईप्रमाणेच गिरीजाने सुद्धा हिंदी असो किंवा मराठी सिनेसृष्टीत तिने आपल्या अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अभिनेत्री आहे गिरीजा ओक.वयाच्या 15 वर्षापासूनच गिरिजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

टॅग्स :सई ताम्हणकरगिरिजा ओक