Join us

"मीच म्हणाले तुम्हाला वेडा.."; अगंबाई अरेच्चा फेम चिमुरडी झालीय आता इतकी मोठी, पहा लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 09:07 IST

अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले बालकलाकार (Child Actors) आता मोठे झालेत. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात.

अनेक मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार (Child Actors) आता मोठे झालेत. त्यांचे लेटेस्ट बघून त्यांना ओळखणं ही कठीण झालायं. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अशाच एका बालकलाकारबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. दिग्दर्शक केदार शिंदे 'अगं बाई अरेच्चा' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमात  संजय नार्वेकर यांना स्त्रीच्या मनातील ऐकू यायचं. 'काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा...', असं म्हणणारी चिमुरडी तुम्हाला आठवतेय का?, ही चिमुकली आता बरीच मोठी झालीय. 

अगं बाई अरेच्चा'मध्ये 'मी तर मनातल्या मनात तुम्हाला वेडा म्हणाले पण तुम्हाला कसं कळलं', असं म्हणून चिडवणाऱ्या  छोट्या चिमुकलीची भूमिका सना शिंदेने साकारली होती. सना शिंदेनं 2004मध्ये अगं माई अरेच्चा या सिनेमात छोट्या मुलीचा छोटासा रोल केला होता. आता सना बरीच मोठी झाली आहे. लवकरच ती 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमात झळकणार आहे. सना ही प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांची मुलगी आहे. केदार शिंदे यांनी लेकीसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. 

केदार शिंदे यांची पोस्ट "काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा.." हे वाक्य बोलणाऱ्या छोट्याशा मुलीला तुम्ही २००४ पासून ओळखतच असाल.. पण २०२३ मध्ये येणाऱ्या महाराष्ट्र शाहीर मध्ये भानूमती म्हणून पदार्पण करणारी हीच छोटीशी मुलगी आहे हे तुम्ही ओळखलत का?? सना शिंदे.. माझी लेक.. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा ह्या प्रवासात तिच्या सोबत असू द्या.. श्री स्वामी समर्थ..

दरम्यान या सिनेमात सना  शाहिरांची पत्नी 'भानुमती कृष्णकांत साबळे' ही भूमिका साकारणार आहे.  शाहीरांचा हा झंझावाती जीवनपट 'महाराष्ट्र शाहीर' सादर करताना केदार शिंदे प्रोडक्शन सोबत आता आहे मराठी चित्रपट क्षेत्रातील महत्वाचं नाव 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट!!' पुढच्या वर्षी २८ एप्रिल रोजी पुन्हा गर्जणार महाराष्ट्राच्या थिएटर्समध्ये अजय-अतुलचे सुमधुर संगीत!! महाराष्ट्र शाहीर, २८ एप्रिल २०२३ जय महाराष्ट्र!" केदार शिंदेंच्या लेकीला पहिल्यांदाच स्क्रिनवर पाहण्यासाठी चाहते मात्र खूपच उत्सुक आहेत.

टॅग्स :केदार शिंदेसेलिब्रिटी