‘ढोल ताशा’चे निर्माते अतुल तापकीर यांची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2017 16:02 IST
‘ढोल ताशा ’ या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल ...
‘ढोल ताशा’चे निर्माते अतुल तापकीर यांची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या!
‘ढोल ताशा ’ या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली.अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर एक मोठी सुसाईड नोट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनीपत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. ‘ढोल ताशा ’ सिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियंकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला माणसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी लिहिली आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.अतुल तापकीर यांची फेसबुक पोस्ट :