Join us

ढिंचॅक गोविंदा गाण्याच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2016 08:59 IST

          पुजा सावंतने नऊवारी नेसुन टिपिकल पारंपारीक लुकमध्ये ढिंचॅक गोविंदा या गाण्यात ठुमके लावले आहेत. ...

          पुजा सावंतने नऊवारी नेसुन टिपिकल पारंपारीक लुकमध्ये ढिंचॅक गोविंदा या गाण्यात ठुमके लावले आहेत. या डान्स परफॉर्मन्स बद्दल ती सांगते, या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य यांनी केली आहे. जवळपास ८०० डान्सर यामध्ये असुन आम्ही एका दिवसात हे गाणे शुट केले. प्रत्येक स्टेपवर गणेशजी स्वत: नाचुन दाखवायचे त्यामुळे धमाल तर आलीच आणि गाणे देखील सुपरहिट झाले. हा चित्रपट साऊथच्या सिनेमाचा रिमेक जरी असला तरी आम्ही जशेच्या तसे सीन्स उचलले नाहीत. आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी सिनेमा बनवित असल्याने त्यात बरेच बदल केले आहेत.            वैदेही परशुरामी देखील चित्रपटासाठी अतिशय उत्सुक असुन यामध्ये अनेक बड्या कलाकारांसमेवत काम करायला मिळाल्याने ती खुष आहे. वैदेही म्हणते, अशोक सराफ, महेश मांजरेकर यासारख्या अनुभवी कलाकारांकडुन मला बरेच काही शिकायला मिळाले. सेटवरचे वातावरण मजेशीर असायचे. एकंदरीतच या चित्रपटामुळे मला एक खुप चांगला इनरिचिंग एक्सपिरियन्स मिळाला आहे.