Join us

Prasad Oak : काय करायचं या अशा लोकांचं ??, प्रसाद ओकने विचारला प्रश्न; लोक म्हणाले-आता काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 17:30 IST

Prasad Oak : प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. जो काहीवेळातच व्हायरल झालाय.

प्रसाद ओक (Prasad oak) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. अनेकदा त्याचे रिल्सही सोशल मीडियावर चर्चेत येत असतात.

प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओद्वारे काय करायचं अशा लोकांचं? असं विचारताना दिसत आहे. प्रसादचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे. या रिलमध्ये लोकांच्या गरिबीचा अंदाज मला तेव्हा आला, जेव्हा माझी बाईक साफ करणारी फाटलेली चड्डीही कुणीतरी घेऊन गेलं. असं हिंदीत कुणी तरी बोलतंय. या व्हिडीओतील प्रसादचं हावभाव भन्नाट आहेत. 

प्रसादच्या या रिल्सवर नेटकऱ्यांनी देखील एकापेक्षा एक कमेंट केल्या आहेत.  वो भी बाईक साफ करने के लिये ले गये होंगे, आता काय बोंबलायचं, अशाचं काहीच नाही होऊ शकतं. अशा कमेंट्स या रिलवर आल्या आहेत. 

अभिनेता प्रसाद ओक हा मराठी इंडस्ट्रीतला सुप्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक सिनेमे आणि मालिका करत त्याने प्रेक्षकांच्या मन स्वत:चं स्थान निर्माण केलयं. नुकताच त्याच्या धर्मवीर 2’ची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.‘धर्मवीर 2’ या चित्रपटातही प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे.

टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटी