दिप्ती देवी झळकणार वेबसीरीजमध्ये ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 18:21 IST
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दिप्ती देवी ही लवकरच एका आगामी वेबसीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. या वेबसीरीजमध्ये ...
दिप्ती देवी झळकणार वेबसीरीजमध्ये ?
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दिप्ती देवी ही लवकरच एका आगामी वेबसीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. या वेबसीरीजमध्ये तिच्यासोबत कोण असणार आहे हे अदयापदेखील कळाले नाही. तसेच तिच्या वेबसीरीजचे नाव गुलदस्त्यात आहे. ही वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार असल्याचे कळत आहे. सध्या सर्वच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार वेबसीरीजच्या प्रेमात पडलेले पाहायला मिळत आहे. अभिनेता अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, पर्ण पेठे, संतोष जुवेकर, गौरी नलावडे, कुशल बद्रिके असे अनेक कलाकार वेबसीरीजमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच नुकतेच उर्मिला कोठारेदेखील हिंदी वेबसीरीजमध्ये झळकणार असल्याचे कळते. आता या सर्व कलाकारांच्या पाठोपाठ प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री दिप्ती देवीदेखील वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. मात्र तिची ही वेबसीरीज हिंदी असणार आहे की मराठी हे अदयापदेखील कळाले नाही. दिप्तीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच मनं जिंकले आहे. तिने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अवघाची संसार, चार दिवस सासूचे, साता जन्माच्या गाठी, आंतरपाठ, मला सासू हवी, झुंज मराठमोळी अशा अनेक मालिकेच्या माध्यमातून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तसेच परिवार, भाग्यविधाता, बडे अच्छ लगते है अशा हिंदी मालिकादेखील तिने केल्या आहेत. आता तिचा एक आगामी मराठी चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर आणि सौरभ गोगटे झळकणार आहेत. अशा या दोन तगडया कलाकारांसोबत दिप्ती देवी ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.