‘चला हवा येऊ द्या’ मंचावर नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं आणि या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसादही मिळतो. आता असं ठामपणे म्हणायला हरकत नाही की चला हवा येऊ द्या हा महाराष्ट्राचा सर्वात लाडका शो आहे. या कार्यक्रमातील अतरंगी कलाकार तर सर्वांना आपलेसे वाटतात.
आता श्रावण महिना सुरु होणार आणि श्रावण सुरु होण्याच्या अगोदर बहुतेकजण गटारी साजरी करतात. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम अशीच मनोरंजनाची गटारी साजरी करणार आहे.
थुकरटवाडीमधील मंडळी एकत्र आल्यावर कधी कशाचा घाट घालतील याचा काही नेम नाही. या गावातील मंडळी जशी अतरंगी तसेच इथे रंगणारे कार्यक्रम, सण, समारंभही अतरंगीच असतात.
यापूर्वी दिवाळी फाट चा असाच आगळा वेगळा कार्यक्रम सादर केल्यानंतर या गावातील मंडळी आता एक अनोखी पहाट साजरी करणार आहेत जिचं नाव आहे गटारी पहाट.
ही गटारी पहाट साजरी करण्यासाठी या गावात दिग्दर्शक संजय जाधव, स्टँडअप कॉमेडी किंग सुनीव पाल, अभिनेता संदिप पाठक, गायिका रेश्मा सोनावणे आणि सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे सहभागी होणार आहेत.
तसेच त्यांच्यासोबतच अभिनेत्री मेधा घाडगे आणि मानसी नाईक यांच्या नृत्याचा जलवा देखील पाहायला मिळणार आहे.
सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९:३० वाजता ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये पाहा गटारी पहाट फक्त आपल्या झी मराठी वाहिनीवर.