कसलेल्या कलाकारांसह झळकणार संस्कृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 16:44 IST
दिलखेचक नृत्याच्या अदांनी तमाम प्रेक्षकांना घायाळ करणारी संस्कृती बालगुडे आता एका नव्या चित्रपटात अनेक ...
कसलेल्या कलाकारांसह झळकणार संस्कृती
दिलखेचक नृत्याच्या अदांनी तमाम प्रेक्षकांना घायाळ करणारी संस्कृती बालगुडे आता एका नव्या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारां समवेत झळकणार आहे. संस्कृतीच्या नृत्याची अन अभिनयाची झलक देखील आपण पाहिली आहे. तिचा निवडुंग चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असुन तिच्या आणखी एका चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला आहे. दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, वंदना गुप्ते, मेघना एरंडे, सोनाली कुलकर्णी, हे कलाकार या चित्रपटात धमाल करताना आपल्याला दिसतील. या चित्रपटाविषयी संस्कृतीने सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत ती भरभरुन बोलली. ऐवढ्या दिग्गज कलाकारांसमवेत मला काम करायचेय याचे खरच टेन्शन आले आहे. या सर्व कलाकारांची ओळख तर आहेच, आम्ही नेहमी भेटत असतो. परंतू आता या कसलेल्या अभिनेत्यांसोबत मला स्क्रिन शेअर करायची आहे याचे मनावर दडपण तर आहेच. पण आनंदही आहे की करिअरच्या या स्टेजवर अशा लोकांसोबत मला काम करण्याची संधी मिळतेय. या सर्वांकडुनच काहीना काही शिकायला मिळणार आहे. आता चित्रपटाची शुटिंग कधी सुरु होतेय अ्न मी कधी काम करतेय अस झालय. सध्या तरी मी या चित्रपटाचे नाव सांगु शकत नाही पण ते तुम्हाला लवकरच समजेल. यामध्ये तुम्हाला एकदम मॅड कॉमेडी पहायला मिळणार हे मात्र नक्की. हा काही टिपिकल हिरो - हिरोईनचा चित्रपट नाही तर सगळ््यांची धमाल कॉमेडि आहे. एवढेच नाही तर सिनेमाचा मुहूर्त झाल््यानंतर या सगळ््या कलाकारांना सेल्फी सेशन करायचे होते. परंतू यामध्ये दिलीप प्रभावळकर यांना बोलवायची भीती वाटत असल्याचे संस्कृतीने सांगितले. पण जेव्हा हिने तिचा फोन सेल्फी काढण्यासाठी आॅन केला तेव्हा दिलीप सरांनी मागुन थम्पअपची पोझ दिल्याचे संस्कृती सांगते. आता हा चित्रपट सुरु होण्याआधीच जर एवढी धमाल होत असेल तर नक्कीच तो पाहण्यासाठी प्रेक्षक उताविळ होतील यात मात्र शंका नाही.