Join us  

सायली संजीवच्या फोटोवर दिलेल्या कमेंटमुळे CSKचा ऋतुराज गायकवाड चर्चेत म्हणाला ‘माझी विकेट फक्त…’,

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 12:36 PM

सायली संजीवच्या एका फोटोवर चेन्नई सुपर किंगमधील ऋतुराज गायकवाडनेही सायलीच्या फोटोंवर "Woahh" अशी कमेंट केली होती.

क्रिकेटर ऋतुराज गायकवाडवर कित्येक तरुणी फिदा आहेत. मात्र ऋतुराजला अभिनेत्री सायली संजीवने क्लीन बोल्ड केल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. त्याचे झाले असे की, सायली संजीव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

 

विविध अंदाजातील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो. सायली संजीवच्या एका  फोटोवर चेन्नई सुपर किंगमधील ऋतुराज गायकवाडनेही सायलीच्या फोटोंवर "Woahh" अशी कमेंट केली होती. 

या कमेंटला सायलीने देखली खास रिप्लाय दिला होता. यावेळी सायलीने ऋतुराजच्या कमेंटवर केलेला रिप्लाय हा खास होता. कारण यांत तिने हार्ट इमोजी सेंड केलेले होते. सायलीचे कमेंटला रिप्लाय पाहून दोघांमध्ये नक्कीच मैत्रीपलीकडे नाते फुल असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. सायली आणि ऋतुराज यांच्यात नेमकं काय सुरुय हेच जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना होती.

 

 

यावर चर्चा झाल्यानंतर अखेर ऋतुराजनेही यावर उत्तर देत चर्चेला कायमचा पूर्णविराम लावला आहे.'माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो आणि क्लिन बोल्ड सुद्धा. कुणाचं काय तर कुणाचं काय' अशी कॉमेंट करत त्यानं दोघांमध्ये काहीही सुरु नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.

मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झालीय. गौरी म्हणून आजही रसिक ओळखत असून त्यांच्या विश्वासाला तसंच प्रेमाला तडा जाऊ देणार नाही असंही तिने सांगितले होते.मराठी मालिकांनंतर सायली मराठी चित्रपटांध्येही यशस्वी पदार्पण केलं.

टॅग्स :सायली संजीव