Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रेया आणि कुशलची पाउट पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 12:51 IST

संपूर्ण जग हे फोटो काढण्यासाठी सेल्फीमय झाले आहे. कारण सेल्फी काढला नाहीतर फोटोशुटच पूर्ण होत नाही. असा अंदाज प्रत्येकाने ...

संपूर्ण जग हे फोटो काढण्यासाठी सेल्फीमय झाले आहे. कारण सेल्फी काढला नाहीतर फोटोशुटच पूर्ण होत नाही. असा अंदाज प्रत्येकाने बांधला आहे. याच सेल्फीबरोबरच पाउट या एक फोटोपोझची भर पडली आहे. फोटो काढताना पाउट  पोझ देणे हे आवश्यकच आहे असे प्रत्येकाला वाटू लागले आहे. प्रेक्षकांचे लाडके कलाकार देखील हे पाउट पोझचे जबरा फॅन झालेले दिसत आहेत. आता हेच पाहा ना, सर्व प्रेक्षकांना खळखळून हसविणारी अभिनेत्री श्रेया बुगडे व अभिनेता कुशल बद्रिके यांनी एक मस्त पाउट पोझ देतानाचा फोटो क्लिक केला आहे. त्यांचा हा सुंदर फोटो अभिनेत्री श्रेया बुगडे हिने सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. त्याच्या या फोटोला चाहत्यांच्या भरभरून कमेंटदेखील पाहायला मिळत आहते. युनिक क्लिक,खतरनाक फोटो अशा विविध कमेंटनी सध्या त्यांच्या या पाउट फोटोची सोशलमिडीयावर चर्चा चालू असल्याचे देखील  दिसते.