आणखीन एका बाप-लेकाची जोडी मराठीत पदार्पणास सज्ज..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 14:44 IST
मराठी चित्रपटात बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा ही पूर्वीपासून आपण पाहत आलो आहोत. महेश कोठारे - आदिनाथ कोठारे, रविंद्र महाजनी ...
आणखीन एका बाप-लेकाची जोडी मराठीत पदार्पणास सज्ज..
मराठी चित्रपटात बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा ही पूर्वीपासून आपण पाहत आलो आहोत. महेश कोठारे - आदिनाथ कोठारे, रविंद्र महाजनी - गश्मीर महाजनी, संदीप पाटील - चिराग पाटील, रमेश देव -अजिंक्य देव यांसारख्या बऱ्याच बाप-बेटांच्या जोड्यांमध्ये आता आणखी एक जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या जोडीत आता, सुबोध भावे आणि मल्हार भावे यांचादेखील समावेश झाला आहे. सुबोध आणि मल्हारची जोडी प्रेक्षकांना फुगे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मल्हारने फार कमी वयात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदापर्ण केले आहे. मल्हार हा सुबोधचा लहान मुलगा आहे. या चित्रपटाची चर्चा गेली कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत आहे. तसेच या चित्रपटाचे प्रमोशनदेखील मराठी कलाकार सोशल मीडियावर भन्नाट पध्दतीने करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात या जोडीसोबत स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे हे कलाकारदेखील झळकणार आहेत. हा चित्रपटचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे यांनी केलयं. या चित्रपटात मल्हारने सुबोधच्या लहानपणीची भूमिका साकारलेली आहे तर स्वप्निल जोशीची भूमिका विहान निशानदार करणार आहे. विहान हा या चित्रपटाचे सहनिमार्ते कार्तिक निशानदार यांचा मुलगा आहे. या चित्रपटामध्ये स्वप्निल आणि सुबोधची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची ही लोकप्रिय जोडी असल्यामुळे साहजिकच प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. तसेच प्रेक्षकांना फुगे हा चित्रपट २ डिसेंबरला सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.