Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona Effect : क्वारंटाईन झालेली ही मराठी अभिनेत्री दिसली सतार वादन करताना, चाहते झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 16:53 IST

मराठी इंडस्ट्रीतील सगळ्यात बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व लोक घरात बंद आहेत. लोक आपल्या बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत. ते स्वतःला स्वतःच्या घरात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत.अशातच आता दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त पेशंटची संख्या वाढत असताना अनेक धक्कादायक बाबीही या आजाराबाबत समोर येत आहेत. सध्या सर्वत्रच लॉकडाऊन आहे त्यामुळे मराठी सेलिब्रेटींनीही स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. 

अभिनेत्री नेहा महाजन घरात बसून सतार वाजवते आहे. नेहाने सतार वाजवतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नेहाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचं कौतूक केले आहे. नेहाला अभिनयासोबतच सतार वादनाचीदेखील आवड आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. नेहाचे वडील पंडित विदुर महाजन हे प्रसिद्ध सतार वादक आहेत. वडिलांना सतार वाजवताना पाहून नेहा देखील या वाद्याच्या प्रेमात पडली. वडिलांसोबत नेहा कार्यक्रमात सहभाग घेते.

नेहा महाजनने मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे. मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनला सगळ्यात बोल्ड अभिनेत्री समजले जाते.

टॅग्स :नेहा महाजन