Congratulation:मराठी चित्रपटसृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात,समोर आले लग्नाचे INSIDE PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 15:02 IST
सध्या सर्वत्रच सनईचे सूर ऐकायला मिळत आहेत.तुळशी विवाहानंतर सगळीकडेच लगीनघाई सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लग्न हा प्रत्येकाच्या ...
Congratulation:मराठी चित्रपटसृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात,समोर आले लग्नाचे INSIDE PHOTOS
सध्या सर्वत्रच सनईचे सूर ऐकायला मिळत आहेत.तुळशी विवाहानंतर सगळीकडेच लगीनघाई सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. मग अशा परिस्थितीत चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींसुद्धा कसे मागे राहतील.कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतही सध्या ‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे. नुकतेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे दिग्दर्शक अभिषेक जावकरसह रेशीमगाठीत अडकली आहे.तिच्या पाठोपाठ आता अशीच काहीशी खुश खबर आणखीन एका अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना दिली आहे.आता आणखी एक अभिनेता विवाह बंधनात अडकला आहे.अभिनेता विजय आंदळकर नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.अभिनेत्री पुजा पुरंदरे हिच्याशी गुरूवारी तो रेशीमगाठीत अडकला आहे.काही महिन्यांपूर्वीच दोघांचा साखरपुडा पार पडला होता. मुळात प्रार्थना बेहेरेच्या लग्न समारंभात विजय आणि पूजा एकत्र आले होते. यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत गुरुवारी विजयने पूजासह मोठ्या थाटात पारंपारीक विवाह पद्धतीने विवाह केला.या लग्नसोहळ्याला विजय आणि पूजाचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.या नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. या फोटोंमध्ये नववधू पूजाचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.विजयने 'ढोल ताशे', 'मी अॅण्ड मिसेस सदाचारी', '702 दिक्षित' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तर पूजाने 'किती सांगायचय मला' या मराठी मालिकेत काम केले आहे. लग्नानंतर सिनेसृष्टीत काम सुरु ठेवणार असल्याचे पूजाने सांगितले. सोशल मीडियावर विजयच्या लग्नाचे फोटो पाहून रसिकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.(Also Read:पाहा प्रार्थना बेहरेच्या लग्नाचे Inside Photo) प्रार्थना बेहरच्या लग्नाला आठ दिवसाहून अधिक दिवस झाले असले तरीही अजूनही सोशल मीडियावर तिच्या लग्नाची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहेत.प्रार्थना आणि अभिषेकने त्यांच्या लग्नानंतर लगेचच त्यांच्या हातावर एक टॅटू काढला आहे. हा टॅटू सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा टॅटू त्या दोघांनी त्यांच्या बोटावर काढला असून हा टॅटू म्हणजे त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख हातावर गोंदवून घेतली आहे.प्रार्थनानेच या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि माझा ड्रीम टॅटू असे त्याच्या सोबत लिहिले आहे.