Join us

‘कॉपी’ च्या चित्रीकरणाचे पहिले शेडयुल्ड पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 17:53 IST

अलीकडच्या काळात  किशोरवयीन मुलांचं अंतरंग उलगडणाºया चित्रपटांची संख्या वाढली आहे. प्रेक्षकसुद्धा या चित्रपटांना चांगला प्रतिसाद देत असल्याने मुलांच्या मनातील ...

अलीकडच्या काळात  किशोरवयीन मुलांचं अंतरंग उलगडणाºया चित्रपटांची संख्या वाढली आहे. प्रेक्षकसुद्धा या चित्रपटांना चांगला प्रतिसाद देत असल्याने मुलांच्या मनातील विचार चित्रपटांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचवून समाजात नवीन विचारधारा रूजवण्याचं काम हे चित्रपट करीत आहेत. मुलांच्या भावविश्वासोबतच शालेय जीवनाशी निगडीत असलेल्या मुद्यांवर प्रकाश टाकणाºया या चित्रपटांच्या पंक्तीत लवकरच आणखी एक मराठी चित्रपट विराजमान होणार आहे. गीतध्वनीमुद्रणाने मुहूर्त झाल्यानंतर लगेचच चित्रीकरणाला सुरूवात झालेल्या कॉपी या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेडयुल्ड नुकतेच पूर्ण करण्यात आले. श्री महालक्ष्मी क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या निमार्ते गणेश पाटील आणि शंकर म्हात्रे यांचा कॉपी हा मराठी चित्रपट शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा असल्याचं शीर्षकावरूनच जाणवतं. हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे ही दिग्दर्शकांची जोडी कॉपीचं दिग्दर्शन करीत आहेत. नुकतंच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेडयुल्ड पण आणि परिसरातील काही लोकेशन्सवर पूर्ण करण्यात आलं. मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, अंशुमन विचारे, जगन्नाथ निवंगुणे, विपुल साळुंखे अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर, पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत, अदनेश मुदशिंगकर, प्रतिक लाड, रोहित सोनावणे, प्रतिक्षा साबळे , शिवाजी पाटणे, सिकंदर मुलानी, आरती पाठक आणि विद्या भागवत या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.