Join us

प्राजक्ताला मिळाली अशीही कॉम्पलिमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 16:55 IST

                 कलाकारांना त्यांच्या अभिनयासाठी थेट प्रेक्षकांकडुन दोन कौतुकाचे शब्द ऐकायला मिळणे ...

  
 
              कलाकारांना त्यांच्या अभिनयासाठी थेट प्रेक्षकांकडुन दोन कौतुकाचे शब्द ऐकायला मिळणे ही फारच मोठी गोष्ट असते. एखादा चित्रपट हिट होणे म्हणजे आपला अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहचल्याची कलाकारांना मिळालेला पोच पावतीच असते.  परंतू नाटकांमध्ये कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत थेट पोहचण्याची संधी असते. यावेळी चुकांना वाव नसतो आणि प्रत्येक गोष्ट ही परफेक्टच करावी लागते. प्राजक्ता माळी सध्या 'प्लेजंट सरप्राईज' नावाचे  नाटक करते आहे.  नुकतीच या नाटकाच्या प्रयोगा दरम्यान प्राजक्ताला एक अनपेक्षित तिकीच मजेशीर अशी कॉम्पलिमेंट मिळाली. आता कॉम्पलिमेंट म्हटल्यावर तू खूप छान दिसतेस, हसतेस, किंवा अभिनय करतेस अशा स्वरूपाची असेल असं तुम्हाला नक्की वाटले असणार.मात्र  तसे बिलकुलच नाहीये. एका चाहत्याने तिला चक्क  तू खूप छान रडतेस ! अशी कॉम्पलिमेंट दिली . इतकचं नाही तर तुझं रडणं बघून आम्हालाही आमचे अश्रृ अनावर होतात. असा हा मजेशीर किस्सा प्राजक्ता माळीने सिएनक्स लोकमतशी बोलतांना सांगितला. आजपर्यंतची सर्वात छान  आणि मजेशीर कॉम्पलिमेंट मिळाल्यामध्ये या कॉम्पलिमेंटच्या यादीत या ही कॉम्पलिमेंटचा समावेश असल्याच प्राजक्त माळीने सांगितलं.