Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉमेडीची बुलेट ट्रेन रंगमंचावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 18:08 IST

कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे प्रसाद खांडेकर आणि संदीप गायकवाड यांची जोडी कानांची घडी तोंडावर बोट या ...

कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे प्रसाद खांडेकर आणि संदीप गायकवाड यांची जोडी कानांची घडी तोंडावर बोट या नाटकात झळकणार आहे. या नाटकात मुक्या-बहिऱ्या असणाऱ्या तीन तरुणांची कथा पाहायला मिळणार आहे. या नाटकात सगळेच कलाकार सांकेतिक भाषेची मदत घेऊन अभिनय करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासाठी या कलाकारांना खास तज्ज्ञांनी दोन महिने प्रशिक्षण दिले होते.