Join us
Daily Top 2Weekly Top 5

रसवंतीगृह चालवणारा मुलगा झाला लोकप्रिय अभिनेता; मराठी सिनेमात करतोय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 15:21 IST

'पोस्ट ऑफिस उघड आहे' या मालिकेतही त्याने काम केलं आहे

आयुष्यात संघर्ष कोणालाच चुकलेला नाही. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष केला आहे. यामध्येच सध्या मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्याने खऱ्या आयुष्यात बराच स्ट्रगल केला आहे. इतकंच नाही तर एकेकाळी रसवंती गृह चालवून त्याने त्याच्या कुटुंबाचं पोट भरलं आहे. मात्र, अथक मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने कलाविश्वात त्याचं स्थान निर्माण केलं.

'पोस्ट ऑफिस उघड आहे' या मालिकेतील लोकप्रिय कलाकार प्रकाश भागवत साऱ्यांनाच ठावूक असेल. या मालिकेत काम करुन प्रकाश घराघरात पोहोचला. इतकंच कशाला त्याने येड्यांची जत्रा या सिनेमातही काम केलं आहे. मात्र, सिनेसृष्टीतील त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. 

वडिलांचं लवकर निधन झाल्यामुळे घरची जबाबदारी प्रकाशवर येऊन पडली. त्यामुळे घर चालवण्यासाठी त्याने कमी वयात काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला तो एका रसवंती गृहामध्ये काम करायचा. हे काम करत असतानाच त्याने हास्यसम्राट या कार्यक्रमाची जाहिरात पाहिली आणि तो ऑडिशन द्यायला पोहोचला.

पहिल्या ऑडिशनमध्ये प्रकाश फेल झाला. मात्र, खचून न जाता त्याने पुन्हा दुसरं ऑडिशन दिलं. यावेळी त्याची निवड झाली आणि त्याने थेट मुंबई गाठलं. मुंबई आल्यानंतर हळूहळू तो कलाविश्वात रुळला. विशेष म्हणजे अभिनयासह त्याने लेखन आणि गायन क्षेत्रातही नशीब आजमावलं आहे. दरम्यान,प्रकाश भागवतने आजवर सुपरस्टार, ढोलकी, 4 इडियट , जस्ट गंमत, येड्यांची जत्रा या सिनेमांमध्ये काम केलं आहे

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीटेलिव्हिजन