एक वर्षानंतर कॉफी...अजूनही गरमचं..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 13:49 IST
हे कोणते जगातले नववे आश्चर्य की, एक वर्षानंतर ही कॉफी अजून गरम कशी ..अशा विचारात पडलात ना? गोंधळून जाऊ ...
एक वर्षानंतर कॉफी...अजूनही गरमचं..
हे कोणते जगातले नववे आश्चर्य की, एक वर्षानंतर ही कॉफी अजून गरम कशी ..अशा विचारात पडलात ना? गोंधळून जाऊ नका. कारण आम्ही कॉफी अणि बरचं काही या चित्रपटाविषयी बोलत आहोत. या चित्रपटाला ३ एप्रिलला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. यामुळे या चित्रपटाला सोशलवेबसाइटवर खूप साºया प्रेक्षकांच्या शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. तसेच या चित्रपटातील कलाकार भूषण प्रधान, नेहा महाजन, वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे यांनी देखील टीमचा सेल्फी काढून सेलिब्रेशन करत असल्याचे सोशलमिडीयाच्या माध्यमातून दिसत आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना अभिनेता भूषण प्रधान म्हणाला, चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले तरी खूप साºया प्रेक्षकांच्या कमेंटस येत आहेत. खूप छान चित्रपट आहे, फर्स्ट टाइम चित्रपट पाहिला, खरचं असे वाटते आताच चित्रपट प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटाचा पार्ट २ येणार आहे का असे अनेक प्रश्न देखील प्रेक्षक विचारात आहे. पण या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना एवढेच सांगू इच्छितो की, या चित्रपटाचा पार्ट २ करण्यासाठी प्रेक्षकांसहित आमची पूर्ण टीम देखील खूप सारी उत्साही असल्याचे भूषणने लोकमतला सांगितले.