‘येक नंबर’ मालिकेतील राऊडी भूमिका साकारणारा देवा सर्वांनाच आता आवडायला लागलाय. राऊडी देवा आता लवकरच सई सोबत चित्रपटात दिसणार आहे.
देवा उर्फ चिराग पाटील लवकरच सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘वझनदार’ या चित्रपटात सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोन अभिनेत्रींसोबत दिसणार आहे.
चिराग ने ‘वझनदार’ चित्रपटापूर्वी राहूल ठाकरे दिग्दर्शित ‘राडा रॉक्स’ चित्रपटात सई सोबत काम करताना दिसला होता. आता ‘वझनदार’ मधून चिराग आणि सई परत एकदा दिसणार आहेत. सई आणि चिरागची वझनदार भूमिका पाहायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. लवकरच ते ‘वझनदार’ चित्रपट घेऊन येतील.