Join us
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्या पोझला लहान मुलांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 13:40 IST

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही मालिका काहीच दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावर सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे प्रमुख भूमिका ...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही मालिका काहीच दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावर सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत शिवलिंग हातात घेतलेली अहिल्याबाई प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. उर्मिलाची ही पोझ सध्या चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. या पोझमध्ये आपले फोटो काढून लहान मुली उर्मिलाला सोशल नेटवर्किंगवर पाठवत आहेत. याविषयी उर्मिला सांगते, "सोशल नेटवर्किंगवर हे फोटो पाहिल्यावर मी खूपच खूश झाले. मुलींनी केवळ माझ्या भूमिकेप्रमाणे पेहरावच केला नाहीये तर त्यांनी शिवलिंगही फोटो काढण्यासाठी आणले आहे याचे मला खूप कौतुक वाटले. शिवलिंग हातात घेतलेले अहिल्याबाईंचे अनेक फोटो नेटवर उपलब्ध आहेत. पण याआधी ही पोझ लहान मुलांमध्ये तितकीशी प्रसिद्ध नव्हती. आमच्या मालिकेच्या निमित्ताने ही पोझ लहान मुलांमध्ये लोकप्रिय झाली आहे याचा मला प्रचंड आनंद होत आहे. निलिमा कोठारे आणि नीता खांडके यांनी अहिल्याबाई या भूमिकेसाठी माझी वेशभूषा खूपच चांगल्या पद्धतीने केली आहे. त्यामुळेच हा लुक प्रेक्षकांना अधिक आवडत आहे."