Join us

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अ डॉट कॉम मॉमचे साँग लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 16:52 IST

जगात सगळ्यात महत्त्वाचं नातं मानलं जात ते आई आणि मुलाचं. या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. असतो तो फक्त ...

जगात सगळ्यात महत्त्वाचं नातं मानलं जात ते आई आणि मुलाचं. या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. असतो तो फक्त भावनिक बंध. मुलाची प्रत्येक चूक पोटात घालून मायेनं जवळ करणारी ती आईच असते. आई मुलाच्या या भावनिक बंधाची गोष्ट सांगणारा अ डॉट कॉम मॉम हा चित्रपट ३० सप्टेबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या गाण्यांचा आॅडियो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, दिग्दर्शिका डॉ. मीना नेरूरकर, अभिनेता साई गुंडेवार आदि उपस्थित होते. कायान प्रोडक्शन बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच डॉ. मीना नेरूरकर यांनी या चित्रपटासाठी संवाद लेखन, गीतं लेखन आणि कोरिओग्राफी केली आहे. तसेच अ डॉट कॉम मॉमच्या भूमिकेत त्या स्वत: दिसणार आहेत.