'दशावतार' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा सध्या हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे. सिनेमाने दोन आठवड्यात १६ कोटींहून जास्त कमाई केलीय. २०२५ मधील मराठी सिनेसृष्टीतील जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून 'दशावतार'कडे बघितलं जातंय. अशातच हा सिनेमा बघून अभिनेत्री छाया कदम यांनी खास पोस्ट लिहिली आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंबद्दल छाया यांनी मोजक्या शब्दात महत्वपूर्ण भावना व्यक्त केल्या आहेत.छाया कदम यांची 'दशावतार' बघून खास पोस्ट
छाया कदम यांनी दिलीप प्रभावळकर आणि उद्धव ठाकरेंचा फोटो पोस्ट करून लिहिलं की, “एक व्यक्तिमत्व कॅमेऱ्याच्या पलीकडले आणि एक व्यक्तिमत्व कॅमेऱ्याच्या अलीकडले. अभिनय कला आणि राजकारण व छायाचित्रकार या माध्यमातून गेली अनेक वर्ष जनाची - मनाची सेवा करणाऱ्या या व्यक्तिमत्वांची ‘दशावतार’ सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या निमित्ताने भेट झाली. ''
''भेटीतून होत जाणाऱ्या संवादातून ही व्यक्तिमत्व आपल्याला खूप जवळून ओळखत असल्याचा त्यांनी दिलेला अनुभव आनंद देणारा होता. सन्मा. दिलीप प्रभावळकर सर आणि सन्मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे सर आपली भेट आणि त्यातून झालेला आपलेपणाचा संवाद माझ्यासाठी एक कलाकार म्हणून प्रचंड सुखकारक होता. दिलीप प्रभावळकर सर तुमच्यातला बलाढ्य नटरंग आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सर तुमच्यातील उत्तुंग चित्रकार कायम आम्हा कलाकारांना अशीच ऊर्जा देत राहो, हेच दशावतारच्या निमित्ताने.'', अशाप्रकारे छाया कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
Web Summary : Chhaya Kadam lauded the movie 'Dashavatar,' a box office hit. She praised Dilip Prabhavalkar and Uddhav Thackeray's long-standing service through art, politics and photography. Kadam expressed joy meeting them and appreciated their support for artists.
Web Summary : छाया कदम ने फिल्म 'दशावतार' की सराहना की, जो बॉक्स ऑफिस पर हिट रही। उन्होंने दिलीप प्रभावळकर और उद्धव ठाकरे की कला, राजनीति और फोटोग्राफी के माध्यम से दी गई लंबी सेवा की सराहना की। कदम ने उनसे मिलकर खुशी जताई और कलाकारों के लिए उनके समर्थन की सराहना की।