Join us
Daily Top 2Weekly Top 5

'छावा'मुळे वाढली संतोष जुवेकरची क्रेझ, गोव्याच्या स्टारबक्समध्ये मिळालं खास सरप्राइज

By कोमल खांबे | Updated: March 4, 2025 09:06 IST

संतोषला 'छावा' सिनेमामुळे प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. नुकतंच संतोष गोव्याला गेला होता. तिथे गोव्याच्या एअरपोर्टवर त्याला खास सरप्राइज मिळालं.

सध्या जिकडेतिकडे फक्त 'छावा' सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवरही केवळ 'छावा'चं राज्य पाहायला मिळत आहे. 'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून अभिनेता विकी कौशलने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. तर या सिनेमात रायाजीच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेता संतोष जुवेकरचंही सर्वत्र कौतुक होत आहे. 

'छावा'मुळे संतोषचं फॅन फॉलोविंग चांगलंच वाढलं आहे. तर या सिनेमामुळे त्याची क्रेझही प्रचंड वाढल्याचं दिसत आहे. संतोषला 'छावा' सिनेमामुळे प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. नुकतंच संतोष गोव्याला गेला होता. तिथे गोव्याच्या एअरपोर्टवर त्याला खास सरप्राइज मिळालं. एअरपोर्टवरील स्टारबक्समधील कर्मचाऱ्यांनी संतोषला पाहताच त्याला खास सरप्राइज दिलं. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. 

चाहत्यांनी दिलेलं हे सरप्राइज बघून संतोषच्या चेहऱ्यावरचा आनंदही स्पष्ट दिसत आहे. संतोष त्यांना "तुम्ही 'छावा' पाहिला का?" असं विचारतो. त्यावर ते चाहते "हो, आणि सिनेमात तुम्हाला बघून आनंद झाला" असं म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत संतोषने चाहत्यांचे आभार मानले आहेत. "Thank u so much मित्रांनो, खूप खूप प्रेम तुम्हांला...ही खरी कमाई", असं संतोषने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने आत्तापर्यंत तब्बल ४५८ कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. या सिनेमात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विकी कौशल, संतोष जुवेकर, दिव्या दत्ता, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, निलकांती पाटेकर अशी स्टारकास्ट आहे. 

टॅग्स :'छावा' चित्रपटसंतोष जुवेकरसिनेमा