Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक मैफिल कॅन्सरपिढीतांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 09:48 IST

आदित्य कल्याणपूर यांची शामल म्युझिक फाऊंडेशन आणि करेज इंडिया कॅन्सर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सरपिडीत व्यक्तींसाठी “दिशा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आदित्य कल्याणपूर यांची शामल म्युझिक फाऊंडेशन आणि करेज इंडिया कॅन्सर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सरपिडीत व्यक्तींसाठी “दिशा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा एक भारतीय शास्त्रीय संगीत चैरिटी शो आहे. या मैफिलीमध्ये अमन अली बंगाश सरोदवर असणार आहेत तर राकेश चौरासिया हे त्यांच्या बासरी वादनाने सर्वाना मंत्रमुग्न करणार आहेत तर आदित्य कल्याणपूर तबल्यावर साथ करणार आहेत.

ही मैफिल १९ जानेवारी २०१९ रोजी भवन्स कला केंद्र भारतीय विद्या मंदिर चौपाटी येथे सायंकाळी ६.३० वाजता रंगणार आहे. या कार्यक्रमामधून उभा राहणारा सर्व निधी कॅन्सरग्रस्त व्यक्तीच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे. या कार्यक्रमाची नोंदणी १९ जानेवारी २०१८ रोजी कार्यक्रमाच्या ठिकाणी सायंकाळी ५.०० वाजता सुरु होईल . अभिजात संगीताचे उपासक आणि शास्त्रीय संगीतातील तज्ज्ञ अमन अली बंगाश, राकेश चौरसिया, आणि आदित्य कल्याणपूर हे तीन दिग्गज कलाकार ही मैफिल रंगवणार आहेत. 

अमन अली बंगाश यांनी आपल्या संगीत शिक्षणाचे धडे वडील पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांच्या कडून घेतले आहेत. तर राकेश चौरसिया यांनी बासरी वादनाचे धडे त्याचे काका पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या कडून घेतले आहेत तर पद्मभूषण झाकीर हुसेन आणि उस्ताद अल्लारखा यांच्या कडे आदित्य कल्याणपूर तबल्याचे संगीत शिक्षण घेतले आहे. ही मैफिल भारतीय शास्त्रीय संगीत रसिकांसाठी ही मैफिल एक पर्वणीच ठरेल. या कार्यक्रमाच्या नोंदणी तुम्ही बुकमायशो वरती करू शकता.