मराठी इंडस्ट्रीमध्ये होतोय बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 15:34 IST
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सुंदर अभिनेत्री स्पृहा जोशीने मराठी इंडस्ट्रीमध्ये बदल होत असल्याचा सुंदर असा ब्लॉग सोशलमिडीयावर ...
मराठी इंडस्ट्रीमध्ये होतोय बदल
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सुंदर अभिनेत्री स्पृहा जोशीने मराठी इंडस्ट्रीमध्ये बदल होत असल्याचा सुंदर असा ब्लॉग सोशलमिडीयावर शेअर केला आहे. स्पृहा म्हणते, जो बदल इंडस्ट्री करत आहे, हा बदल प्रेक्षक देखील आवर्जुन स्वीकारत असल्याच्या आनंद होत आहे. ज्याप्रमाणे पर्सनॅलिटी बदलावी लागते. आहार-बिहारात बदल करावा लागतो. काही अप्रिय परिस्थितींचा स्वीकार करावा लागतो. त्याप्रमाणे इंडस्ट्रीतदेखील बदल होत आहे. पण सध्या ही जी प्रयोगशीलता अंगिकारली जातेय. हा बदल चित्रसृष्टीला एका नव्या वळणावर घेऊन जाणारा आहे. एखाद्या चित्रपटाला मिळणारं यश, एखाद्या कलाकाराला मिळणारी प्रसिद्धी, त्याच्या फिटनेसचं झालेलं कौतुक हे रिले रेससारखं असतं. त्याच्या या प्रसिद्धीमुळे प्रेरणा घेऊन अनेकजण इतके कष्ट घेण्यास सिद्ध होतात. धावताना दुसºयांच्या हातातली बॅटन घेण्यास हात आपोआप पुढे सरसावतात. यासारखी चांगली गोष्ट ती कुठली? चित्ररसिक बदल स्वीकारत आहेत. ही आणखी एक नोंद घेण्याजोगी बाब आहे. मध्यंतरी 'फुंतरु'च्या निमित्ताने आपण हा अनुभव देखील घेतला आहे. तमाशापट, विनोदी चित्रपट, ग्रामीण ढंगाचे चित्रपट आदींना प्रसिद्धी मिळण्याचा एक कालखंड होता. आता मात्र रसिक सर्व प्रकारची मांडणी आणि सर्व प्रकारच्या विषयांचं स्वागत करत आहेत. म्हणूनच मराठी कलाकार प्रयोगशील होत आहेत. मराठी चित्रपटांतील बदल हा काही एका रात्रीत घडलेला नाही. श्वास पासून त्याची सुरुवात झाली. त्यानंतर सतीश राजवाडे, गजेंद्र अहिरे, संजय सूरकर, महेश मांजरेकर, निशिकांत कामत यांनी हळूहळू वेगवेगळ्या धाटणीच आणि विषयांवरचे चित्रपट स्वीकारायची प्रेक्षकांना सवय लावली. आणि त्यातूनच आजचा हा काळ आपल्याला अनुभवायला मिळतो आहे.