Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाई गं' सिनेमातील नवीन गाणं 'चांद थांबला..' भेटीला, स्वप्नील-प्रार्थनाच्या केमिस्ट्रीला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 15:07 IST

Bai Ga Movie : अलिकडेच स्वप्नील जोशीच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. 'बाई गं' असे स्वप्नीलच्या आगामी चित्रपटाचे नाव असून यात स्वप्नीलसोबत तब्बल ६ अभिनेत्री दिसणार आहेत.

अलिकडेच स्वप्नील जोशी(Swapnil Joshi)च्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. 'बाई गं' (Bai Ga Marathi Movie) असे स्वप्नीलच्या आगामी चित्रपटाचे नाव असून यात स्वप्नीलसोबत तब्बल ६ अभिनेत्री दिसणार आहेत. यात  सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे , अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या अभिनेत्रींचा समावेश आहे. नुकतेच या चित्रपटातील 'चांद थांबला..' हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

'बाई गं' चित्रपटातील 'चांद थांबला..' हे नवीन गाणे नुकतेच भेटीला आले आहे. हे गाणे प्रार्थना बेहरे आणि स्वप्नील जोशीवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातील या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना भावते आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.  हा चित्रपट  प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, यात हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे. 

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग जाधव यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती डॉ .आशिष अग्रवाल, नितीन प्रकाश वैद्य सोबत ओ एम जी मीडिया व्हेंचर्स यांनी केली आहे.'बाई गं' चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. तर, गाणी जय अत्रे, मंदार चोळकर आणि समीर सामंत यांनी लिहीली आहेत. वरुण लिखते यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. १२ जुलैला 'बाई गं' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशीप्रार्थना बेहरे