Join us
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज ! आईच्या कडेवरील गोंडस मुलीला ओळखलंत का?; मराठी अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय एका क्रिकेटरसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 07:00 IST

मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो चर्चेत आला आहे.

कलाकार म्हटलं की चर्चा तर होणारच! मग त्यांची असो किंवा त्यांची सोशल मीडियावरील पोस्ट. बऱ्याचदा सोशल मीडियावर जुन्या आठवणी शेअर करतात तर कधी बालपणीचे फोटो शेअर करून त्या आठवणीत रमतात. नुकतेच आता अभिनेत्री सायली संजीव हिने आई वडिलांसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळते आहे. 

सायली संजीवने तिच्या बालपणीचे फोटो शेअर केला आहे. त्यातील एका फोटोत ती वडिलांसोबत दिसते आहे तर दुसऱ्या फोटोत ती आईच्या कडेवर दिसत आहे. तिने हे फोटो शेअर करून लिहिले की, मला इतके अद्भूत जीवन दिल्याबद्दल मी आभारी आहे. तुम्ही माझे जीवन आहात. सायली संजीवच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. 

गेल्या बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटर ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव यांच्या अफेयर्सची चर्चा रंगताना दिसते आहे. दोघांच्या सोशल मीडियावरील अॅक्टिव्हिटीवरून चर्चेला उधाण आले आहे. मात्र, याबाबत त्या दोघांनी मौन बाळगले आहे.सायली संजीवने करिअरची सुरूवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली आहे. त्यानंतर, तिने ‘पोलीस लाइन्स – एक पूर्ण सत्य’, आटपाडी नाईट्स, मन फकिरा, एबी अँड सीडी आणि द स्टोरी ऑफ पैठणी, झिम्मा या चित्रपटातही काम केले. तिने ‘काहे दिया परदेस’,‘परफेक्ट पाटी’, ‘गुलमोहर’ आणि ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेत काम केले आहे.

टॅग्स :सायली संजीव