प्रसाद कांबळी प्रस्तुत भद्रकाली प्रॉडक्शनची ५३ वी नाट्यकृती आणि केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘गेला उडत’ या नाटकाचा शुभारंभ दिनांक १३ मे रोजी शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे झाला होता. काल दिनांक २६ जून रोजी परळ येथील दामोदर हॉल येथे या नाटकाचा २५ वा प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीने संपन्न झाला.
आपल्या सिध्दूची आणि ‘गेला उडत’ या नाटकाची जादू प्रेक्षकांवर झाली आहे. भद्रकाली प्रॉडक्शन, केदार शिंदे यांचं दिग्दर्शन आणि सिध्दार्थची प्रमुख भूमिका या तिन्ही गोष्टी म्हणजे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवाणीच आहे. सिध्दूच्या नाटकाचा २५ वा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला आहे तर सेलिब्रेशन तो बनता है ना. असंच मस्त सेलिब्रेशन ‘गेला उडत’ च्या टीमने केक कापून केलं.